माता आणि बालकांचे आरोग्य संरक्षण

योजनेचा उद्देश:
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या पोषणाची गरज पूर्ण करणे, आणि मातेचे व बालकाचे आरोग्य सुरक्षित करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते.

  • गर्भवती महिलेला ₹5,000/- पर्यंत आर्थिक मदत तीन हप्त्यांत दिली जाते.
  • पहिल्या बाळाच्या जन्मावेळीच हा लाभ दिला जातो.
  • लाभार्थी महिलेला नियमित आरोग्य तपासणीसाठी, लसीकरणासाठी आणि पौष्टिक आहारासाठी प्रोत्साहन.
  • गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या माता.
  • पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ही योजना लागू.
  • महिला 19 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या असाव्यात.
  • महिला सरकारी सेवेत नसाव्यात (सरकारी कर्मचारी लाभार्थी नाहीत).
  • महिला भारतीय नागरिक असावी.
  • पहिला हप्ता – गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर – ₹1,000/-
  • दुसरा हप्ता – किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) केल्यावर – ₹2,000/-
  • तिसरा हप्ता – बाळ जन्मानंतर लसीकरण पूर्ण केल्यावर (BCG, OPV, DPT, HepB) – ₹2,000/-

एकूण: ₹5,000/- थेट बँक खात्यात जमा

  • गर्भवती महिलेचा आधार कार्ड
  • बँक खाते तपशील (महिलेच्या नावावर)
  • गर्भधारणेचा नोंदणी पुरावा (ANM / आरोग्य केंद्र प्रमाणपत्र)
  • जन्‍म प्रमाणपत्र (बाळासाठी)
  • लसीकरण प्रमाणपत्र
  1. जवळच्या आंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात संपर्क साधा.
  2. PMMVY फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करा.
  3. पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर निधी थेट बँक खात्यावर जमा होतो.
  • महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र
  • अंगणवाडी सेविका / आशा कार्यकर्ती
  • अधिकृत वेबसाइट: https://wcd.nic.in | https://pmmvy-cas.nic.in
  • माता व बाळाच्या पोषणासाठी आर्थिक मदत
  • सुरक्षित मातृत्वासाठी प्रोत्साहन
  • महिलांचे आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन
  • लसीकरण आणि आरोग्य सेवा वापरण्यासाठी प्रेरणा